फोटो ओळ - दिल्ली ः भजन सम्राट अनुप जलोटा आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. राम मेघवाल यांच्या हस्त पुरस्कार स्वीकारताना डॉ. प्रशांत गायकवाड

फोटो ओळ – दिल्ली ः भजन सम्राट अनुप जलोटा आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. राम मेघवाल यांच्या हस्त पुरस्कार स्वीकारताना डॉ. प्रशांत गायकवाड

फोटो ओळ – दिल्ली ः भजन सम्राट अनुप जलोटा आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. राम मेघवाल यांच्या हस्त पुरस्कार स्वीकारताना डॉ. प्रशांत गायकवाड

फोटो ओळ - दिल्ली ः भजन सम्राट अनुप जलोटा आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. राम मेघवाल यांच्या हस्त पुरस्कार स्वीकारताना डॉ. प्रशांत गायकवाड

विश्‍वविक्रमी तबलावादक डॉ. गायकवाड यांना जयप्रकाश नारायण स्मृती पुरस्कार
नागपूर ः तबला वादनामध्ये गिनेज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसह अनेक पुरस्कारप्राप्त येथील डॉ. प्रशांत गायकवाड यांना नुकताच दिल्ली येथे लोकनायक जयप्रकाश नारायण अध्ययन विकास केंद्रातर्फे आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. राम मेघवाल आणि भजन सम्राट अनुप जलोटा यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार बहाल करण्यात आला.

जगाच्या ४७ देशांतील कलावंतांना भारतीय कला, संगीत आणि संस्कृतीचे धडे देण्याचा विक्रम डॉ. गायकवाड यांच्या नावावर आहे. यासाठी त्यांना दिल्लीच्या इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये गौरवान्वित करण्यात आले. आपल्या देशात साहित्य, कला, शिक्षण, सिनेमा, पत्रकारिता, रंगमंच, गुड गवर्नस, पर्यावरण आणि सामाजिक कार्यात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. जयप्रकाश नारायण यांच्या स्वप्नातील भारतामध्ये भोगवाद आणि भ्रष्ट्राचाराला अजिबात वाव नव्हता. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्यांच्या विचारांवर वाटचाल करणाऱ्या समाजसेवकांना या पुरस्काराने गौरवान्वित करण्यात येते.

ज्योतिषशास्त्राचे गाढे अभ्यासक आणि सुप्रसिद्ध तबलावादक डॉ. प्रशांत गायकवाड यांना जयप्रकाश नारायण यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ मिळालेला हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या शिरपेचात खोवलेला आणखी एक मानाचा तुरा आहे. यापुढेही साहित्य, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणार असल्याचा मानस डॉ. गायकवाड यांनी सत्काराला उत्तर देताना केला.

Leave a Reply

%d bloggers like this: